जय वाल्मिक युवा मंचतर्फे गुणवंतांचा झाला सन्मान

0

शहादा। जय वाल्मिकी युवा मंचतर्फे शहादा येथे शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांग गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. दहावी, बारावी, पदवी व पदवीत्तर पदवीप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. दहावीची विद्यार्थीनी नेहा लोटन कोळी हिने प्रतिकूल परिस्थिती मध्ये ही 91.40% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. बारावीची विद्यार्थिनी कुलश्री छोटुलाल शिरसाठ हिचे रशिया येथे एम.बी.बी.एस् या अभ्यासक्रमासाठी निवड झाली त्यांना यावेळी गौरविण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी अध्यक्ष डॉ.राजेश कोळी यांनी मार्गदर्शन केले. डॉ.अरुण भानुदास कोळी, योगेश मोतीलाल सावळे (शि.विस्तार.अधि.), मनोहर वाघ, जगदीश शिरसाठ (कृषि अधिकारी), देवा वाघ, युवराज बागुल (नगरसेवक, खेतीया), महेंद्र कोळी, रविंद्र कोळी या मान्यवरांनी मार्गदर्शन केले. जय वाल्मिकी युवा मंचच्या कार्याविषयी मनिष कोळी ह्यांनी माहिती दिली. सूत्रसंचालन प्रवीण सावळे, आभार मुकेश चव्हाण चिरणेकर यांनी केले. यशस्वीतेसाठी नितीन कोळी पाडळदेकर,हेमंत कोळी,मनिष कोळी,सतिष बोरसे,सचिन सोलंकी,पंकज कोळी,सुरेश बोरसे,सचिन कोळी पाडळदेकर, लांबोळा, शेल्टि, कमरावद, जावदा, मंदाना, देऊर, संसदे, डामरखेडा, पाडळदे, अलखेड येथील मंचचे कार्यकर्ते यांनी कामकाज पाहिले.