जय विजय करंडकावर रमणबागेची मोहोर

0

पुणे । शुक्रवार पेठेतील आदर्श विद्यालय माजी विद्यार्थी संघटना नातूबाग परिसराच्यावतीने विविध शाळांमधील माजी विद्यार्थ्यांसाठी आयोजित जय विजय करंडक 2017 या एकांकिका स्पर्धेत रमणबागेच्या माजी विद्यार्थ्यांना बाजी मारली. द एन्ड ऑफ… या रमणबागेच्या एकांकिकेला प्रथम पारितोषिक मिळाले. तर, वसुंधरायण या एकांकिकेसाठी अहिल्यादेवी प्रशालेच्या माजी विद्यार्थीनींनी द्वितीय क्रमांक आणि आम्ही अभिनव या गटाने बोन्साय या एकांकिकेसाठी तृतीय क्रमांक पटकावित जय विजय करंडक एकांकिका स्पर्धा गाजविली.

भरतनाट्य मंदिर येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले यांच्या हस्ते झाले. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा उर्मिला देव, कार्याध्यक्षा अंजली मते-धुमाळ, अर्चना त्रिभुवन, विजय कोटस्थाने, भालचंद्र पुरंदरे, शेखर भागवत, दिपाली निरगुडकर, अरुण पटवर्धन, अ‍ॅड. सुभाष मोहिते, आयोजक प्रदीप अष्टपुत्रे, प्रशांत मते, संदीप गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत रविंद्र सातपुते यांना उत्कृष्ट दिग्दर्शनाकरीता विशेष पारितोषिक देण्यात आले. उत्तम अभिनयाकरीता पुरूष गटात प्रथम पारितोषिक डॉ. अमित त्रिभूवन, द्वितीय शैलेश यादव यांना मिळाले. तसेच स्त्री गटात प्रथम पारितोषिक नीरजा वडके आणि द्वितीय अंकिता बिराजदार यांना मिळाले. प्रदीप अष्टपुत्रे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.