जय शाह प्रकरण : बाहेर तडजोड करण्यास द वायरचा नकार

0

सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला
जुलै महिन्यात या प्रकरणी पुढील सुनावणी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने पत्रकार रोहिणी सिंह आणि जय शाह यांना मानहानीचे प्रकरण न्यायालयाबाहेर मिटवण्याचा सल्ला दिला. पण द वायरने हा सल्ला मानण्यास नकार दिला असून ती बातमी जनहितासाठी प्रसिद्ध केल्याचे म्हटले आहे. जुलै महिन्यात या प्रकरणी पुढील सुनावणी होईल. द वायरने आपल्या वेब पोर्टलवर भाजपाध्यक्ष अमित शाह यांचा मुलगा जय शहा याच्या कंपनीचे उत्पन्न भाजपची सत्ता आल्यानंतर एका वर्षात 50 कोटींवरून थेट 80 कोटी झाल्याचे म्हटले होते. यामुळे जय शाह यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता.

जय हे अमित शाह यांचे पुत्र
सर्वोच्च न्यायालय वायरच्या पत्रकार राोहिणी सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करत आहे. रोहिणी यांनी गुजरातच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांचे पुत्र जय शाह यांनी दाखल केलेली मानहानी याचिका रद्द करण्याची मागणी रद्द केली होती. मागील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने 12 एप्रिलपर्यंत खटला रोखला होता. गुजरात उच्च न्यायालयाने वेब पोर्टल द वायरच्या पत्रकार रोहिणी सिंह यांची याचिका फेटाळली होती. यामध्ये त्यांनी जय शाहद्वारे दाखल करण्यात आलेल्या मानहानीचा खटला रद्द करण्याची मागणी केली होती.

एका वर्षांत उत्त्पन्न 80 कोटींवर
वेबसाइटने दावा केला होता की, केंद्रात एनडीए सरकार सत्तेवर आल्यानंतर एक वर्षांनी कंपनीचा व्यवसाय 16 हजार टक्क्यांनी वाढला होता. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर कंपनीच्या व्यवसायात प्रचंड वाढ झाली होती. एक वर्षांत त्यांचे उत्पन्न 50 हजार रूपयांवरून 80 कोटी रूपयांपर्यंत पोहोचला होता. जय शाह यांनी या लेखाच्या लेखिका रोहिणी सिंह यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.