जय हनुमान ज्ञान गुन सागर..

0

भुसावळ। शहरातील विविध मंदिरात हनुमान जयंती पारंपरिक उत्साहात साजरी झाली. अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, एकमुखाने बोला बोला जय हनुमान..‘ अशा भक्ती गीतांच्या संगतीत सामर्थ्याचे आराध्य दैवत हनुमानाची स्तुती विविध मंदिरात झाली. विविध तालीम मंडळ, क्रीडामंडळांबरोबर मंदिरात जन्मसोहळा झाला.

मंदिर, येथेही जन्मकाळ उत्सव झाला. सूर्योदयाच्या वेळी सुवासिनींनी पाळणा म्हटला. त्यानंतर आरती, भक्तिगीते सादर झाली. त्यानंतर सुंठवडा वाटप झाले. रुईच्या पानाची माला, गोडतेल, साखर, नारळ, फळे, दुधाचा प्रसाद वाटपही विविध ठिकाणी झाले. दिवसभर विविध मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी मंदिराचे महंत प्रशांत वैष्णव यांनी यांच्या मार्गदर्शनाखाी बजरंग भजनी मंडळाचे अध्यक्ष रविंद्र पुरोहित, सुखदेव चौरसिया, संतोष टाक, अ‍ॅड. गोकुळ अ्रग्रवाल, अशोक धांडे, संतो नागला, पंडित रवीओम शर्मा, रमेश ईखनकर, यशवंतसिंग चौधरी, जे.बी. कोटेचा, अजय पाटील, दिनेश महाजन, सचिन पाटील, बबलू बर्‍हाटे, उमाकांत शर्मा, श्रीकृष्ण चोखडकर, मयुर शर्मा, योगेश पाटील, रुपेश चौधरी, भुषण जोशी, ताराचंद शर्मा, चिंटू झवर, धनगराज सोनार, येगेश सोनार, अमोल सोनार, रोहित नेमाडे, आकाश काबारा, सारंग भारंबे, सोमनाथ चौरसिया यांनी सहकार्य केले.

सहस्त्रधारा महाअभिषेक
राममंदिर वॉर्डातील बडा हनुमान मंदिरात सोमवारी सकाळी 6 वाजेपासून ते हनुमान जन्मापर्यंत अखंड हनुमान चालिसाचे पठण गोविदं अग्रवाल, सुरेश शर्मा, रविंद्र पुरोहित, श्रीकांत नागला, चिंटू झवंर, योगेश अग्रवाल यांच्यातर्फे करण्यात आले. या अखंड हनुमान चालिसा पठणाला संपुर्ण दिवस भरात भाविकांनी सहभाग घेतला. भारतात दुर्मीळ होणारी हनुमंताची सहस्त्रनाम पुजन व सहस्त्रधारा महाअभिषेक करण्यात आला. या पुजेत 9 जण बसले होते. हनुमंताच्या 1 हजार नावाने विविध वस्तूंची यथाशक्ती आहुती देऊन 1 हजार धारांनी हनुमंताचा महाभिषेक करण्यात आला. पहाटे 3.30 वाजेपासून हनुमंताला पंचामृताने अभिषेक होऊन सकाळी सुर्योदयाच्या वेळेस हनुमंताच्या जन्मसोहळा महाआरती करण्यात आली. नंतर दिवसभर पंजेरीया विशिष्ठ प्रसादाचे वाटप झाले. 10 वाजता अखंड हनुमान चालीस पठण व पुर्णाहुती होम झाला. सायंकाळी 6 वाजता बडा हनुमान मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली.

सावद्यात लघुरुद्रयाग
हनुमान जयंतीचे औचित्य साधून जय बजरंग प्रतिष्ठानतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सुंदरकांड तसेच भजन आणि 10 एप्रिलला लघुरुद्र अभिषेक रुद्रयाग आयोजित केला होता. 11 रोजी सकाळी हनुमान जन्मोत्सव, 8.30 वाजता सामूहिक हनुमान चालिसा पठण करण्यात आली. यानंतर सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी भामलवाडी येथील महंत पवनगिरी महाराज, विहिंपचे ललित चौधरी उपस्थित होते.