जर्मनीत 500 किलो वजनाचा जिवंत बॉम्ब सापडला

0

 जर्मनी: जर्मनीच्या फँकफ्रंट येथे रविवारी बॉम्बनाशक पथकाने दुसऱ्या महायुद्धातील 500 किलो वजनाचा जिवंत बॉम्ब निकामी केला. दुसऱ्या महायुद्धाला जवळपास 70 वर्ष उलटून अद्यापही जर्मनीत त्या युद्धातील जिवंत बॉम्ब सापडत आहेत.  हा बॉम्ब आढळल्यानंतर येथे काही वेळा करता घबराट उडाली होती. बॉम्ब निष्क्रीय करण्यासाठी सुरक्षिततेसाठी परिसरातील जवळपास साडेअठरा हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते.

हा बॉम्ब निकामी करण्यासाठी बॉम्बनाशक पथकाला एक तासाहून अधिक वेळ लागला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकी सैन्याकडून हा बॉम्ब टाकण्यात आल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. बॉम्ब आढळल्यानंतर परिसरातील एक हजार मीटर पर्यंत राहणाऱ्या सर्वांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते.

परिसर खाली केल्यानंतर बॉम्ब निकामी करण्याची मोहीम बॉम्बनाशक पथकाने हाती घेतली आणि दोनतासपेक्षा जास्त वेळानंतर हा बॉम्ब निकामी केला. त्यानंतर पथकाने अधिकृत ट्विटर अंकाऊंटवरून या बॉम्बचा फोटो ट्विट केला आणि बॉम्ब निकामी केल्याची ‘गुड न्यूज’ नागिरकांना दिली.