सेंट पीटर्सबर्ग । खरंतर अंतिम सामन्याच्या आधीपासून त्यांना विजेते म्हणून गणले जात होते. रविवारी झालेल्या विजेतेपदाच्या सामन्यात जर्मनीने बलाढ्य चिलीवर 1-0 असा विजय मिळवत त्याच्यावर शिक्कामोर्तब करत कॉन्फेडरेशन चषक जिंकला. हा विजय जर्मनीसाठी दुहेरी बोनस ठरला. कारण दोन दिवसांआधी जर्मनीच्या 21 वर्षांखालील संघाने युरोपियन अजिंक्यपद स्पर्धा जिंकली होती.सेंट पीटर्सबर्ग । खरंतर अंतिम सामन्याच्या आधीपासून त्यांना विजेते म्हणून गणले जात होते. रविवारी झालेल्या विजेतेपदाच्या सामन्यात जर्मनीने बलाढ्य चिलीवर 1-0 असा विजय मिळवत त्याच्यावर शिक्कामोर्तब करत कॉन्फेडरेशन चषक जिंकला. हा विजय जर्मनीसाठी दुहेरी बोनस ठरला. कारण दोन दिवसांआधी जर्मनीच्या 21 वर्षांखालील संघाने युरोपियन अजिंक्यपद स्पर्धा जिंकली होती.
नृत्य आणि संगीताच्या कार्यक्रमाने अंतिम सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या हाफमधील 20 व्या मिनिटाला लार्स स्टिंडलने जर्मनीसाठी पहिला आणि निर्णायक गोल केला. मिडफिल्डर मार्सेलो दियाजने केलेल्या छोट्या चुकीची मोठी किंमत चिलीला चुकवावी लागली. मार्सेलोकडून चेंडू निसटल्यामुळे जर्मनीचा गोल झाला होता. सहकार्याकडून मिळालेल्या पासवर, चेंडूवर नियंत्रण मिळवण्यात मास्रलोने काहीसा उशीर केला.
ज्युलियन ड्रॅक्सलर गोल्डन बॉलने सन्मानित स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून जर्मनीचा कर्णधार ज्युलियन ड्रॅक्सलरला गोल्डन बॉल देऊन गौरवण्यात आले. या विजयानंतर ड्रॅक्सलर म्हणाला की, चांगले खेळल्यामुळे विजेतेपदावर आमचाच हक्क होता. या स्पर्धेआधी आम्ही एकत्र खेळलेलो नव्हतो. त्यामुळे या विजयाचे महत्त्व आणखी वाढले आहे. युवा संघ असल्यामुळे आमच्यासाठी हा विजय वेगळा आहे. आता चषक घेऊन आम्ही सुट्टीवर जाणार आहोत. विश्वविजेत्या जर्मनीने पहिल्यांदाच कॉन्फेडरेशन चषक जिंकला आहे.
आघाडीची होती संधी यादरम्यान जर्मनीच्या टिमो वर्नरने झटकन चेंडूवर ताबा मिळवत स्टिंडलकडे पास केला. त्यावेळी गोलरक्शक किंवा दुसरा बचावपटू गोलपोस्टजवळ नसल्याने स्टिंडला गोल करण्यात अडथळा आला नाही. या गोलनंतर चिलीच्या खेळाडूंनी आक्रमक आणि अनोख्या पद्धतीचा खेळ करत सामन्यात बाऊन्सबॅक करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पहिला हाफ संपायच्या आधी जर्मनीला आघाडीत भर टाकण्याची संधी मिळाली होती. पण क्लाउडियो ब्राव्होने लियॉन गोरेत्झचा तो शॉट अडवल्यामुळे जर्मनीची ती संधी हुकली.
जर्मनीची कामगिरी1 फिफा विश्वचषक : 1954, 1974, 1990, 20142 युरोपियन अजिंक्यपद स्पर्धा : 1972, 1980, 19963 फिफा कॉन्फेडरेशन चषक : 2017
फिफा कॉन्फेडरेशन चषक विजेते देश ब्राझिल – 1997, 2005, 2009, 2013.फ्रांस – 2001, 2003.अर्जेंटिना – 1992डेन्मार्क – 1995मेक्सिको – 1999जर्मनी – 2017