जळगाव । जलजागृती सप्ताहाद्वारे जलबचतीचे महत्त्व पटल्याने जलयुक्त शिवार अभियानातील जलसंधारण प्रक्रिया, पाणी वापर, पाण्याचे ऑडीट या संकल्पना जनमानसात पोहचणार्या जनजागृतीने जलयुक्त जळगाव प्रत्यक्ष साकारता येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी जलजागृती सप्ताहाच्या शुभारंभा प्रसंगी व्यक्त केला. जलजागृती सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्या हस्ते जलपूजन करुन करण्यात आला. यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, जळगाव पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता सु.प्र. सैंदाणसिंग, कार्यकारी अभियंता संजीव चोपडे, कार्यकारी अभियंता आर.एस. विसवे, एस.जे. माने, टी.पी. चिनावलकर, एस. पी. काळे, पी.आर. मोरे, आर. जी. पाटील, एस. सी अहिरे, एस.एफ. गावित, ज्येष्ठ पत्रकार विजय पाठक, जलश्री संस्थेच्या स्वाती संवस्तर, जी.एम फाऊंडेशनचे अरविंद देशमुख, पितांबर भावसार, नीर फाऊंडेशनचे सागर महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करुन नंतर तापी, गिरणा, पूर्णा, वाघुर, सुकी या नद्यांच्या पाण्याने भरलेले कलश एकत्रित करुन त्यांचे मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
जलयुक्त जळगाव शक्य
यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी निंबाळकर म्हणाले की, अभियानाच्या माध्यमातून होणार्या जलजागृतीमुळे जलयुक्त जळगाव करणे शक्य होईल, जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे यंदा जिल्ह्यात टँकरच्या संख्येत घट झाल्याबद्दल समाधान श्री. निंबाळकर यांनी व्यक्त केले. शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील वरुण देवता मंदिरात 16 मार्च गुरुवारी सकाळी जलपूजन करुन पाच प्रमुख नद्यातील जलकुंभ पूजन करण्यात आले.
महाविद्यालयाचा जलदिंडीत सहभाग
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, संत कंवरराम ट्रस्टचे रमेश मतानी, दयानंद विसराणी,. शंकरलाल लखवानी, राजकुमार प्रथ्यानी आदी मान्यवर तसेच संत हरदास विद्यालय, या. दे. पाटील महाविद्यालय प्रतिभा माध्यमिक विद्यालय या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिक्षक अभियंता सु.प्र. सैंदाणसिंग यांनी केले. टी.पी. चिनावलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.