जलतरणपटू ड्रॅसेलने फेल्प्सला गाठले

0

बुडापेस्ट । अमेरिकेचा युवा जलतरणपटू सेलेब ड्रसेलने जागतिक जलतरण स्पर्धेत सात सुवर्णपदकांची कमाई करत दिग्गज जलतरणपटू मायकल फेल्प्सच्या एका स्पर्धेत सात सुवर्णपदके जिंकण्याच्या विश्‍वविक्रमाशी बरोबरी केली आहे. पुरुषांच्या चार बाय 100 मीटर मिडले रिले स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत हा विक्रम केला. या स्पर्धेत डॅ्रसेलने बटरफ्लाय प्रकारात आपला जलवा दाखवला. ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके जिंकणार्‍या फेल्प्सने 10 वर्षांपूर्वी मेलबर्नमधील जागतिक स्पर्धेत सात सुवर्णपदके जिंकली होती.

डॅ्रसेलने स्पर्धेत पुरुषांच्या 50 मीटर, 100 मीटर फ्रीस्टाईल, 100 मीटर बटरफ्लाय, चार बाय 100 मीटर रिले, 100 मिश्र फ्रीस्टाईल रिले आणि चार बाय 100 मीटर मिश्र मिडले रिले स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले.

एका दिवसात तीन सुवर्ण
ड्रॅसेलने रिले स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकत एका दिवसात तीन सुवर्णपदक जिंकण्याचा विक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच जलतरणपटू आहे. 50 मीटर फ्रीस्टाईल स्पर्धा 21.15 सेकंद, 100 मीटर बटरफ्लाय स्पर्धा 49.86 सेंकदात जिंकल्यावर 20 वर्षीय ड्रॅसेलने विश्‍वविक्रमासह रिलेेचे सुवर्णपदक जिंकून दिले. शर्यती संपताच ड्रॅसेल अभ्यास करण्यासाठी रुमवर गेला. बिजगणिताचे प्रोफेसर उदार मनाचे असल्यामुळे परिक्षेची चिंता वाटत नसल्याची प्रतिक्रीया ड्रॅसेलने दिले.