जलतरणपटू रोहन मोरे यांना तेनसिंग र्नोगे पुरस्कार

0

पुणे । केंद्र शासनाच्या वतीने साहसी खेळासाठी दिला जाणार्या सर्वोच्च तेनसिंग र्नोगे पुरस्कार पुण्याचा आंतरराष्ट्रीय जलतरणपटू रोहन मोरे याला घोषित करण्यात आला आहे. इन्फोसिसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या रोहनला हा पुरस्कार दिनांक 29 ऑगस्ट 2017 रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. केंद्रीय क्रीडा व युवा संघटन मंत्रालय सचिव ए. के. दुबे यांच्या अध्यक्षतेखाली ले. कर्नल सतेंद्र वार्म, अरूनिमा सिन्हा, मिनाक्षी पाहुजा आणि अभिषेक त्रिपाठी यांच्या निवड समीतीने या पुरस्कारासाठी रोहनची निवड जाहीर केली. रोहन सध्या जागतीक क्रमवारीत ओशन सेव्हन या सागरी मोहीमेत 7 व्या क्रमांकावर असून भारतात व अशिया खंडात अग्र मानांकित आहे.

अर्जुन पुरस्काराप्रमाणेच तोलामोलाचा पुरस्कार
अर्जुन पुरस्काराच्या समवेत दिला जाणारा हा तेवढ्याच तोलामोलाचा पुरस्कार असून त्याचे स्वरूप 5 लाख रुपये रोख, राष्ट्रपती प्रशस्तिपत्रक, प्रतिमा व ब्लेजरअसे असणार आहे. देशातील सागरी जलतरण, गिर्यारोहण व हवाई साहसी खेळ यामध्ये आतंरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करणार्‍यास हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देण्याचे त्याचे लक्ष
केंद्र सरकारच्या या उत्तेजनामुळे माझे मनोधेर्य अधिक बळकट झालेले आहे. सन 2016 च्या रिओ ऑलिंम्पिक स्पर्धेच्यावेळी माझ्या हातातोंडाशी आलेला घास अखेरच्या चाचणीत निसटला होता.

ती खंत आजही माझ्या मनात आहे. परंतु, आता ह्या पुरस्कारामुळे मी जोमाने सन 2020 सालच्या ऑलिंम्पिक स्पर्धेची तयारी करण्यासाठी कटीबद्ध झालेलो आहे. आता भारताला टोकीयो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून द्यायचे ते एकच ध्येय माझ्यासमोर आहे. हा पुरस्कार मी माझ्या आई वडिलांना समर्पित करीत आहे; अशा शब्दात रोहन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.