जलतरण स्पर्धा : महाराष्ट्राला सुवर्णपदक

0

पुणे । महाराष्ट्राच्या मुलींनी बलाढ्य कर्नाटकच्या मुलींना मागे टाकत राष्ट्रीय ज्युनियर जलतरण स्पर्धेत 4 बाय 220 मीटर फ्रिस्टाईल रिले स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. साध्वी धुरीम युक्ता वखारिया, रुतुजा तळेगावकर आणि रायना सालढाणा यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या संघाने अव्वल स्थान पटकावताना 9:17:54 मिनीटे अशी वेळ नोंदवली. दुसर्‍या स्थानावर राहिलेल्या कर्नाटकाच्या संघाने 9: 23: 45 मिनीटे अशी कामगिरी साधली. कांस्यपदक विजेत्या तामिळनाडूच्या संघाने ही शर्यत 9:23:81 मिनीटांमध्ये पूर्ण केली. दुसर्‍या गटातील याच प्रकारात कर्नाटकने महाराष्ट्राला मागे टाकले.

मिडले रिलेमध्येही कर्नाटक
कर्नाटकाने आपले वर्चस्व सिद्ध करताना मुलींच्या पहिल्या गटातील 4 बाय 100 मीटर मिडले स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले. या शर्यतीत त्यांनी 4:43:03 मिनीटे अशी वेळ नोंदवत बाजी मारली. महाराष्ट्र आणि तामिळनाडूला या शर्यतीत अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या संघाने 4:50:87 मिनीटे अशी वेळ नोदवली तर तामिळनाडूच्या संघाने 4:55:50 मिनीटांमध्ये शर्यत पूर्ण केली.