रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचा उपक्रम
चिंचवड : रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित जलपर्णीमुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई पर्व दुसरे यातील सहावा आठवडा केजुबाई घाट थेरगांव येथे पार पडला. रविवारी (दि.11 रोजी) पाच ट्रक भरून जलपर्णी नदीतून बाहेर काढण्यात आली. आजवर 1 हजार 475 ट्रक जलपर्णी नदीतून बाहेर काढण्यात आली आहे. या अभियानात जीवित नदीच्या शैलजा देशपांडे, पागे, हर्षद तुळपुळे, ओंकार गानू, मराठवाड्यातील नद्यांना पुनर्जीवित करण्याचे काम करणारे आनंद असोलकर, सोमनाथ आबा मुसुगडे, प्रदीप वाल्हेकर, अॅड. हर्षद नढे, अॅड. महेश टेमगिरे, बरना बोस, शाम मलगी, अभिषेक वाल्हेकर, सिद्देश्वर चिले, रो. प्रोजेक्ट डायरेक्टर युवराज वाल्हेकर, फंड रेझिंग डायरेक्टर सचिन काळभोर, आयटी डायरेक्टर गणेश बोरा, सुभाष वाल्हेकर, मारूती उत्तेकर, जगन्नाथ फडतरे, एस.पी.वायर्सच्या 15 कामगारांची टीम अभियानासाठी उपस्थित होते.
स्वयंसेवकांसाठी फराळाचे आयोजन
पवना नदीमधील पाण्याचे नमुने घेऊन पाणी प्रदूषण आपण किती मोठ्या प्रमाणात करतोय यासाठी ओंकार गानू आणि हर्षद तुळपुळे यांनी सहकार्य केले. लवकरच यावर काम सुरू होणार आहे. श्रमदानासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व नागरिक व पर्यावरण प्रेमींसाठी रोटरीकडून दिवाळी फराळ व्यवस्था करण्यात आली. सोमनाथ हरपुडे यांनी सूत्रसंचलन केले. संस्थापक अध्यक्ष प्रदीप पोपटराव वाल्हेकर यांनी आभार मानले. रविवारी (दि. 18 नोव्हेंबर) सकाळी आठ वाजता केजुबाई घाट येथे श्रमदानासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन प्रदीप वाल्हेकर यांनी केले.