शहादा । वृक्ष लागवड व संगोपन करण्यासाठी लोकांच्या व सामाजिक संस्थांच्या आग्रही भूमिकेने चळवळ उभी राहिल्याशिवाय कार्यक्रम यशस्वी होणार नाही. वृक्ष लागवडीप्रमाणे पाणी पुनर्भरण करण्यासाठी व्हिला सारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.तालुक्यातील मलोनी शिवारात एनआयआर ग्रीन व्हिला संस्थेच्या वतीने शासनाच्या वतीने वृक्ष लागवडीसाठी प्रतिसाद म्हणून 250 वृक्षांचे लागवड जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांच्या उपस्थितीत झाले.
यांची होती उपस्थिती
यावेळी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता शरद पाटील,पत्रकार रमाकांत पाटील,जिल्हा परिषद सदस्य जयपालसिंह रावल,अभिजित पाटील,महात्मा गांधी स.का.मंडळाचे अध्यक्ष डी.एच.पाटील, अनिल भामरे, मलोनी ग्रामपंचायत उपसरपंच भारत पाटील, नायब तहसीलदार डॉ. उल्हास देवरे,वाय.डी. पाटील,प्रा.ईश्वर चौधरी,संभू पाटील, कार्यकारी अभियंता झेलीसंग पावरा, वृक्षप्रेमी शांतीलाल पाटील, जिल्हा कृषी अधिकारी सुभाष नारे उपस्थित होते. त्यांचा सत्कार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला .सदर कार्यक्रमास शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. आर.टी. पाटील यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुशांत पाटील, आकाश पाटील, विलास पाटील यांनी परिश्रम घेतले.