जलयुक्तसह विविध योजनांबाबत आज चर्चासत्र

0

जळगाव । जलयुक्त शिवार अभियानाच्या अपुर्ण कामांबाबत मुख्यमंत्रींनी व्हीडीओ कॉन्फरसिंग द्वारे 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मंत्रालयातील मुख्यमंत्री समिती कक्ष येथे आढावा बैठक घेतली. दरम्यान याविषयी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेंना पत्र प्राप्त झाले आहे. आयोजित बैठकीला विषयांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत 25 हजार गावांचे उद्दीष्ट्य असतांना केवळ 19 हजार गावे परिपुर्ण करण्यात आली आहेत, याविषयी राज्यातील सर्व जिल्हापरीषदांची सविस्तर माहीती घेण्यात येणार असुन उर्वरित कामांचे उद्दिष्ट्य पुर्ण करण्याच्या कार्यवाहीचा आढावा यावेळी घेण्यात येणार आहे, दरम्यान यात 2016-17 व 2017-18 यावर्षातील पुर्ण व अपुर्ण कामांचा आढावा घेण्यात येणार असुन 2018-19 यावर्षा करीता गावंची निवड करुन टप्पा-1 ची कामे पुर्ण करण्याबाबत सुचना करण्यात येणार आहेत.

अपुर्ण असलेल्या योजना
मागेल त्याला शेततळे योजनेबद्दल आढावा, नरेगा अंतर्गत 1 लाख सिंचन विहीरींचे उद्दीष्ठ यांबाबत प्रत्येक जिल्हानिहाय कामांच्या प्रगतीबद्दल आढावा, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेबद्दल आढावा, शेतीपंपांच्या विद्दुतिकरणासंदर्भात पेड पेंडीग केसेसचा जिल्हानिहाय आढावा, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजने अंतर्गत 2017-18 या वर्षामध्ये 6 लाख 15 हजार घरांचे उद्दीष्ट्य असतांना केवळ 2 लाख घरे पुर्ण करण्यात आली आहेत. उर्वरीत घरकुलांच्या कामे पुर्ण करण्यासाठी नियोजनाविषयी कार्यवाहीचा आढावा, सेक यादी प्रमाणे 12 लाख बेघरांना माचे 2019 पर्यंत घरे देण्याचे उद्दीष्ट्य पुणर्र् करण्याबाबत नियोजन व बेघरांना द्यावयाच्या शासकीय जमीनी, गांवरान जमीनी, नरेगा मस्टर, वाळुटंचाई, एन.ए. संबधीत कार्यवाहीचा जिल्हानिहाय आढावा, रमाई व शबरी घरकुल योजनेचा आढावा याचा समावेश आहे.