जलयुक्त कामांची चौकशी करा

0

भुसावळ । तालुक्यातील साकेगाव-कंडारी गटातील सिंचन विभागातील बंधार्‍यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहे. त्यामुळे या कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत तपासणी करण्यात यावी.

झालेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याने संबंधित ठेकेदाराचे बिलदेयके अदा करण्यात येवू नये, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील यांनी केली आहे. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. खडका व जोगलखेडा भागात कोणतीही कामे झाली नसल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे.