रावेर। वनयुक्त, जलयुक्तसाठी एक लोकचळवळ होण्याची गरज आहे वृक्ष लागवड करणे फक्त अधिकार्यांचे गरज नसून समाजाच्या सर्व घटकांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन आमदार हरिभाऊ जावळे यांनी केले. येथील वन विभाग आवारात विविध योजनांचा कार्यक्रम घेण्यात आले त्यावेळी जावळे बोलत होते. ग्रीन आर्मी, वृक्ष लागवड सहभाग घेणार्यांचे प्रमाणपत्र पाडळे खुर्द येथील काही ग्रामस्थांना घरगुती गॅस वाटप, तसेच वन-व्यवस्थापन समिती व वनविभागातर्फे पाण्याचे टँकरचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जिल्हाउपाध्यक्ष पद्माकर महाजन उपवनसंरक्षक संजय दहीवाले, पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, वनक्षेत्रपाल आर.जी. राणे, जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती सुरेश धनके आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने वृक्षप्रेमी उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी सहावनसंरक्षक अशोक नाले, जिल्हा परिषद सदस्या नंदा पाटील, पंचायत समिती सदस्य जितु पाटिल, योगेश पाटील, जुम्मा तडवी, दिपक पाटील, नगरसेवक यशवंत दलाल नायब तहसीलदार सि एच पाटील कृषि अधिकारी एस.एस. पवार वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी. बारेला, भूमिअभिलेख पंकज फेगडे, डॉ उदय ओतारी प्रल्हाद पाटील, अमोल पाटील, अशोक शिंदे, डॉ. योगिता पाटील, डॉ. संध्या वानखेडे, डॉ. संदिप पाटील, भिका साळुखे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दीपक नगरे यांनी केले.
‘लालमाती’ला पन्नास हजारांचे पारितोषिक
लालमाती येथे शासनाच्या विविध योजनेंतर्गत स्थानिक ग्रामस्थ व वनमजुर यांच्या संयुक्त विद्यामाने जलयुक्त शिवार, सीमेंट नाला बांध, माती नाला बांध, वृक्ष लागवड यासह इतर विकास कामे केली. यामुळे परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने जलपातळीतदेखील चांगलीच वाढ होत आहे. याचीच दखल घेऊन संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समितीसाठी भव्य पारितोषिक योजनेंतर्गत तालुक्यातील लालमाती या आदिवासी गावाला पन्नास हजाराचे पारितोषिक मिळाले. याचे वितरण ग्रामस्थांना करण्यात आले.
यांनी घेतले परिश्रम
वनक्षेत्रपाल आर.जी राणे, वनपाल भागवत तायडे, किशोर गुजर, धीरज वसईकर, प्रकाश सलगर, वनरक्षक अतुल तायडे, संभाजी सर्यवंशी, रोहिणी थोरात, सुपडु सपकाळे, हरीष थोरात, वैशाली थोरात, ममता पाटील, अरुण ढेवले, गोकुळ गोवाळ, रेखा खैरनार, अरुण भंगाळे यांच्यासह वनविभागाच्या कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.