जलयुक्त शिवारमुळे शेती समृध्दतेच्या मार्गावर

0

भुसावळ। राज्यभरात शासनाने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत शेततळे, बंधारे उभाारले असून निश्‍चितच याचा फायदा शेतकर्यांना होणार आहे. यामुळे शेतातील विहीरींची जलपातळी वाढली आहे. उन्हाळ्यात देखील भरपूर पाणी आहे. याचा फायदा फळबागांसाठी होऊन राज्यातील शेती समृध्दतेच्या मार्गावर जात असल्याची प्रतिक्रीया जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिली. जलयुक्त अभियाना अंतर्गत 2014 ते 17 दरम्यान झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हात 232 गावाची निवड झाली होती त्याची पाहणी करण्यासाठी शुक्रवार 12 रोजी दुपारी मुक्ताईनगर तालुक्यातील दौरा आटोपल्यानंतर गोजोरा आणि वांजोळा गावाजवळील शेततळ्यासह नाला खोलीकरण कामांची शिंदे यांनी पाहणी केली़.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी आमदार संजय सावकारे, उपसभापती मनीषा पाटील, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार मीनाक्षी चव्हाण, तालुका कृषी अधिकारी पी.डी.देवरे, गटविकास अधिकारी सुभाष मावळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, प्रा़सुनील नेवे, सुधाकर जावळे, वरणगावचे नगरसेवक गणेश धनगर, बबलू माळी, भालचंद्र पाटील, गोजोरा सरपंच शिवाजी पाटील, वांजोळा सरपंच नरेंद्र पाटील व उपसरपंच देविदास सावळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत़े. जलयुक्त अभियानामुळे पाण्याचा साठा शेतकर्यांजवळ असतो त्याचा फायदा शेतकर्यांना होऊन त्यांचे उत्पादनात वाढ होत आहे. जिल्ह्यात फक्त 9 टँकर सुरु आहे. भूजलपातळीत वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील शेतकरी या योजनेमुळे सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास देखील जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला.