साठवण बंधार्‍यांचे खोलीकरण

0

धुळे- तालुक्यातील भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होवून शेतीतील विहीरी,लहान मोठी धरणे, तलाव या पाणी साठविण्याच्या स्त्रोतांना त्याचा थेट फायदा व्हावा पर्यायाने दुष्काळ कायमचा हद्दपार व्हावा म्हणून तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेची कामे चांगल्या प्रतिची करून त्यांना चालना देण्याचे काम आम्ही करीत आहोत असे प्रतिपादन आ.कुणाल पाटील यांनी आज कृषी विभागाने आयोजित खोलीकरण कामाच्या भूमीपुजन समारंभाप्रसंगी केले. सद्या शिरुड,गरताड,नरव्हाळ या भागात धुळे तालुका कृषी विभागाच्यावतीने 54 ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानातून कामे हाती घेण्यात आली आहेत.

योजनेची व्याप्ती वाढविणे गरजेचे
धुळे तालुका कृषी विभागाच्यावतीने आज दि.25 डिसेंबर रोजी नरव्हाळ, गरताड, शिरुड या ठिकाणी बंधार्‍यांचे खोलीकरण कामाला सुरूवात करण्यात आली.या कामांचे भूमीपुजन आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि, राज्यात जलयुक्त शिवार अभियानाला पाहिजे तेवढे यश मिळाले नाही या योजनेची व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे तरीही आम्ही धुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना या जास्त लाभ व्हावा म्हणून जलयुक्तच्या कामे प्रभावी व उत्तम प्रतिची कशी होतील याची काळजी घेत असतो तरही तालुक्यात सुरु असलेल्या सिंचनाच्या कामात ग्रामस्थांनी सहभागी व्हावे आणि त्यातून सिंचनाची लोकचळवळ उभी करावी, आज गरताड आणि शिरुड शिवारात सुरु होणार्‍या कामांमुळे येथील शेतीसह पिण्याचा पाण्याचाही मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.अशी माहिती आ.पाटील यांनी शेवटी दिली.

54 कामे कामांना चालना
धुळे तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने दोन टप्प्यात 67 गावांना कामे सुरु करण्यात येणार आहेत तर काही ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत.दरम्यान आज जलयुक्त शिवार अभियानातून एकूण 54 कामे हाती घेण्यात आली आहेत.गरताड येथे 5 सिमेंट नाला बंधार्‍यांचे खोलीकरण करण्याचे काम होत आहे यासाठी एकूण 11.58 लक्ष रुपये खर्च होणार आहेत त्यातून 40टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होवून 40 हेक्टर शेतीला त्याचा फायदा होणार आहे.नरव्हाळ येथे खोलीकरणाचे 12 कामे हाती घेतली आहेत त्यासाठी एकूण18.22लक्ष रूपये मंजूर करण्यात आले आहेत.96टीएमसी पाणीसाठा होणार आहे ज्यामुळे 100हेक्टर शेतीला लाभ होईल.तसेच शिरुड शिवारात एकूण 33 साठवण बंधार्‍यांचे कामे हाती घेतली आहेत ज्यामुळे 250 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.याकामाकरीता 78.74लक्ष रुपयाचा निधी मंजुर झाला आहे याकामामुळे 250 हेक्टर शेताला पाण्याचा फायदा होणार आहे.

साठवण बंधार्‍याच्या खोलीकरणाच्या कार्यक्रमाला आ.कुणाल पाटील यांच्यासमवेत समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे, तालुका कृषी अधिकारी आण्णासाहेब गागरे, कृऊबा माजी सभापती गुलाबराव कोतेकर, गुलाबराव पाटील,कृऊबा संचालक राजेंद्र भदाणे, विजय पाटील, खरेदी विक्रीचे व्हा.चेअरमन दिनकर पाटील, पं.स.सदस्य प्रमोद भदाणे, प्रविण ठाकरे,शिरुड सरपंच दिपक पाटील, गरताड सरपंच अरूण पाटील,युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष राजीव पाटील,रवि कचवे,ज्ञानेश्‍वर सोनवणे,उपसरपंच प्रल्हाद कचवे,घमेश पाटील, लक्ष्मण भिल,डि.एस.पाटील,बापू पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.