अमळनेर। तालुक्यातील कळमसरे गावाचा जलयुक्त शिवार अभियानांतर्गत समावेश करण्यात यावा अशी मागणी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. कळमसरे ग्रामपंचायतीतर्फे महाजन यांना निवेदन देण्यात आले. कळमसरे गावाच्या जवळपास कुठेही पाण्याचा स्त्रोत नसल्याने गावापासून आठ किलोमीटर अंतरावरुन पिण्यासाठी पाणी आणावे लागते. 3 कि.मी. अंतरावर खाजगी कुपनलिका अधिग्रहित करुन आठ दिवसात पाणी पुरवठा होत आहे.
कळमसरे येथील उपसरपंच व ग्रामस्थ भाजपात
ग्रामपंचायत मालकीच्या जमीन पडित असून वासरे, खेड़ी गावाकडून येणारा नाला असून मोठ्या प्रमाणात पाणी अडविले गेल्यास सिंचनाचा मोठा फायदा होणार आहे. असे झाल्यास पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सरपंच कल्पना पवार, उपसरपंच मुरलीधर महाजन, आबा महाजन, यशोदा निकम, छायाबाई मिस्तरी, रमेश चौधरी, योगेंद्रसिंग राजपूत, रणजीतसिंग राजपूत, मंगलसिंग राजपूत, संतोष महाजन, सुरेश महाजन, प्रकाश कुंभार, संजीव महाजन, जितेंद्र महाजन, मधुकर निकम, पंकज निकम,ज्ञानेश्वर महाजन, प्रदीप महाजन, भागवत निकम आदी उपस्थित होते. दरम्यान कळमसरे येथील उपसरपंच व खान्देश माळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर महाजन यांनी काल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यांच्या सोबत पंकज निकम, प्रकाश कुंभार, शिवाजी राजपूत,चंदू शर्मा, यांच्यासह आदींनी भाजपात प्रवेश केला आहे.