शहादा । शहरातील डोंगरगाव रस्त्याजवळील आदित्य हॉस्पीटल जवळ शुध्द पाण्याचा जलवाहिनीला गळती लागली असल्याने हजारो लिटर शुध्द पाणी वाया जात होते . हे वृत्त दैनिक जनशक्ती प्रकाशीत केल्यानंतर याची दखल घेत नगरपालिका प्रशासनाने जलवाहीनीची दुरूस्ती सुरू केली आहे. हजारो लिटर पाणी वाहून जात असल्याने नाराजी व्यक्त करीत हा खड्डा त्वरीत बुजवण्याची मागणी वाढली होती.
खड्डा बुजण्याची होती मागणी
एका बाजुला नगरपालीकाप्रशासन व शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करुन शहराला शुध्द पाणीपुरवठा केला जातो मात्र दुसर्या बाजुला जलवाहीनीला गळती लागल्याने पाण्याची मोठ्याप्रमाणात नासाडी होत होती. गळतीमुळे पाण्याची मोठी डाब साचली होती. त्यामुळे घाणीचे सामराज्य निर्माण झाले होते. लागले होते परिसरातील नागरीकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यासाठी परिसरातील नागरीकानी गळती थांबवुन तो खड्डा त्वरीत बुजवावा अशी मागणी होत केली होती . आज कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकामध्ये समाधान व्यक्त होत आहे