रावेर- तालुक्यातील आभोडा धरणातील पाण्याचे आवर्तन बोकड नदी पात्रात सोडण्यात आले. यावेळी या भागातील शेतकरी व अधिकारी उपस्थित होते. अभोडा धरण परीसरातील भुजल पातळी खोलवर गेली असून शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी तालुक्यातील रसलपूर, केर्हाळे आदी भागातील शेतकर्यांनी पाटबंधारे विभागाकडे एक लाख 62 हजार रूपये जमा केले. जिल्हा परीषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती सुरेश धनके यांच्या हस्ते विधीवत पूजन करून पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. यावेळी रावेर शिक्षण परीसर मंडळाचे चेअरमन हेमंत नाईक, अभियंता विलास नेमाडे, रमेश पवार, गोपाल महाजन, पोलीस पाटील पांडुरंग महाजन, लक्ष्मण मोपारी, दिलीप धनके, प्रमोद धनके, ललित नाईक, गोपाल पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.