जलसंधारणाच्या कामातून पाण्याची उपलब्धता

0

शिरपूर। तालुक्याच्या प्रत्येक भागात पाण्याची उपलब्धता व मुबलकता करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून सर्व भागात याकामी यश मिळत आहे. संपूर्ण तालुक्यात पाण्याचे काम मोठया प्रमाणात यशस्वीरीत्या सुरु असून तालुक्यातील उर्वरीत भागात सर्व्हे करण्यात येवून त्या कामांनाही लवकरच सुरुवात होणार आहे.

शिरपूर पॅटर्न अंतर्गत जलसंधारणाच्या कामाची यशस्वीता व इतरत्र होत असलेले या कामाचे अनुकरण, यामुळे शिरपूरची ख्याती सर्वत्र होत असल्याची बाब भूषणावह आहे. या कामात लोकसहभाग होण्यास प्रारंभ झाल्याची बाब देखील आनंददायी आहे असे प्रतिपादन प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भुपेशभाई पटेल यांनी केले.

शिरपूर पॅटर्न अंतर्गत जलसंधारणाचे काम
मांजरोद येथे शिरपूर पॅटर्न अंतर्गत जलसंधारणाच्या कामाचे भूमिपूजन प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भुपेशभाई पटेल यांच्या हस्ते व अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जि.प. उपाध्यक्ष के.डी.पाटील, माजी जि.प. सदस्य नरेंद्रसिंह जमादार, शांताराम फुले, शिसाका माजी व्हा. चेअरमन एकनाथ जमादार, बालाजी संस्थानचे उपाध्यक्ष गोपाल भंडारी, भुलेश्‍वर पाटील, सुरेश पाटील, विजयसिंह गुर्जर, माजी मुख्याध्यापक बी.बी.पाटील, गोपाल पाटील, प्रदीप पाटील, डॉ. पवन पाटील, योगेश पाटील, सुनिल पाटील, अभय पाटील, भास्क्र पाटील, माजी पं.स. सदस्य प्रकाश चौधरी, दरबार राजपूत, राजेश भंडारी, सागरलाल राजपूत, महेंद्र राजपूत, महेश पाटील, प्रकाश कोळी, संतोष जाधव, दर्यावसिंग जाधव, सुनिल जैन, विविध संस्थांचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.