जलसंपदामंत्र्यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे ‘डफडे वाजवा’

0

जळगाव । शेतकर्‍यांना कर्ज माफी झालीच पाहिजे, मंत्रालयात शेतकर्‍यांला झालेल्या मारहाणीचा निषेध करत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयासमोर राष्ट्रवादीकडून ‘डफडे वाजवा आंदोलन’ करण्यात आले. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात युवक जिल्हा अध्यक्ष योगेश देसले, आय टी सेल अध्यक्ष संदीप पवार, किशोर पाटील, विनायक चव्हाण, सोपान पाटील, गुणवंत निळं, निखिल सावरे, किरण पाटील, निखिल पाटील, सौरभ त्रिभुवन, ललित भगूळ, राज कोळी आदींनी सहभाग घेतला होता. देवकरांनी आंदोलनाचे नेतृत्व केल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आमदाराचे निलंबन रद्द करा
विधानसभेत राष्ट्रवादीच्या आमदारांचे निलंबन करण्यात आले ते रद्द करण्यात यावे, घरगुती सिलिंडरचे वाढविलेले दर कमी करावे, वीज दरवाढ कमी करावी या्र मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. कोर्ट चौकातील शिवतीर्थासमोरील जलसंपदामंत्री यांचे संपर्क कार्यालयाजवळ यावेळी मोठी गर्दी जमली होती. पोलीस दलाच्यावतीने खबदारी म्हणून बंदोबस्त लावण्यात आला होता. घरकुल घोटाळ्यातील संशयित आरोपी माजी मंत्री देवकर यांनी अचानक एका मंत्र्याच्या कार्यालया समोर केलेल्या आंदोलनातील एन्ट्री राजकीय क्षेत्रात महत्वाची मानली जात आहे.