मुंबई : राज्य मंत्रिमंडळात सुरुवातीला राज्यमंत्री असलेल्या राम शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती दिल्यानंतर आता त्यांच्याकडील जलसंधारण, राजशिष्टाचार खात्याबरोबरच नव्याने स्थापन केलेल्या ओबीसी विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली तसेच त्यांच्याकडे विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गाच्या कल्याण विभागाची जबाबदारीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या खांद्यावर टाकली आहे.
राज्याच्या राजकारणात फार क्वचितवेळा राज्यमंत्री असलेल्या मंत्र्याला कॅबिनेट पदी बढती मिळाल्यानंतर लगेच त्यांच्याकडील विभागांच्या संख्येतही काही कालावधीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राम शिंदे यांचे मंत्रिमंडळातील महत्त्व वाढत असल्याचे दिसून येत आहे.