वरणगाव- पालिकेस वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता मात्र तो मुदतीत निधी खर्च न झालेल्या शासनाने 31 मार्च रोजी राज्यातील सर्वच पालिकांमध्ये अखर्चित निधी शासन तिजोरीत जमा केला होता हा निधी परत करण्यासाठी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला तसेच जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. मंत्री चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नगरविकास विभागाने शासनाच्या तिजोरीत जमा केलेला तीन कोटींचा निधी हा वरणगाव नगरपरीषदेस परत दिला पाहिजे, असा मुद्दा मांडून आक्रमक पवित्रा घेतला. औरंगाबाद खंडपीठात दोन वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्याचे कामकाज तसेच पीएमसी नेमण्यासाठी झालेली दिरंगाई व विधान परीषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निधी खर्च होवू शकला नाही, असे मुद्दे मांडण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी याबाबत दखल घेत प्रधान सचिवांना वरणगाव नगरपरीषदेस तीन कोटींचा निधी परत देण्याचे आदेश दिले.
विकासकामे करण्यास मदत होणार -नगराध्यक्ष
वरणगाव पालिकेला निधी परत मिळाल्याने शहरात विकासकामे करणे सोयीचे होणार असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले. मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांचे आपण त्यासाठी ऋणी असल्याचे त्यांनी सांगितले. उपनगराध्यक्ष शेख अखलाक, मुख्यधिकारी सौरभ जोशी, नगरसेविका माला मेढे, नसरीन बी.साजीद कुरेशी, मेहनाजबी इरफान पिंजारी, शशी कोलते, प्रतिभा समाधान चौधरी, नगरसेवक राजेंद्र चौधरी, रवींद्र सोनवणे, विष्णू खोले, गणेश चौधरी यांनीही आभार मानले आहेत.