जलसंधारण राज्यमंत्री राम शिंदे ; बाबरे साठवण बंधार्याचे जलपूजन
धुळे : शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणून जलयुक्त शिवार अभियान टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 या योजनेकडे पाहिले जाते. या योजनेच्या अनुषंगाने उपलब्ध झालेले जलसाठेच खरे या अभियानाचे यश असल्याचे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण व राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. तालुक्यातील बाबरे येथील साठवण बंधारा व वाघी नाल्याचे पुनरुज्जीवनातून उपलब्ध झालेल्या जलसाठ्यांचे जलपूजन प्रा.शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार कुणाल पाटील, जिल्हा परीषदेचे समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे, जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.रंगनाथन, उप वनसंरक्षक जी.के.अनारसे, उप विभागीय अधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, तहसीलदार अमोल मोरे, तालुका कृषी अधिकारी गागरे, बोधगावचे सरपंच अविनाश पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यमंत्री प्रा.शिंदे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी मुबलक स्वरुपात शाश्वत जलसाठे निर्माण झाले आहेत. या जलसाठ्यांचा येथील शेतकर्यांनी लाभ घेत शेती व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उत्पादीत केलेली भेंडी थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात होत असल्याने तालुक्यातील हा उपक्रम नक्कीच आदर्शवत ठरेल.
राज्यमंत्र्यांचा भेंडी भेट देऊन सत्कार
बोधगावचे सरपंच अविनाश पाटील यांनी समस्त गावकर्यांच्या वतीने मंत्री प्रा.राम शिंदे यांचा भेंडी भेट देऊन सत्कार केला. यावेळी सर्वप्रथम बाबरे येथील साठवण बंधार्याचे जलपपजन जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले नंतर बोधगांव शिवारातील वाघी नाल्यातील जलसाठ्याचे जलपूजन करण्यात आले तर नरव्हाळ शिवारात वनविभागामार्फत जलयुक्त शिवार अभियानातंर्गत तयार करण्यात आलेल्या खोल सलग समतल चर या कामाची पहाणी मंत्री प्रा.शिंदे यांनी केली.