जळगाव । आदिवासी दिनानिमित्त आदिवासी एकता परिषदेकडून बुधवारी 9 रोजी शिवतिर्थ मैदानापासून रॅली काढण्यात आली. आदिवासी वसतीगृहातील शेकडो युवक-युवतींनी सहभाग घेतला.
पारंपरिक ढोल व संगीताच्या गजरात आदिवासी विद्यार्थ्यांनी बहारदार नृृत्य सादर केले. शिवतिर्थ मैदानापासून स्टेट बॅँक, नवीन बसस्थानक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक मार्गे प्रभात चौकातील शानभाग सभागृहाजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला.