चाळीसगाव। जागतिक जलदिनानिमित्त तालुक्यातील पिलखोड तळणी जि.प. नवीन प्राथमिक शाळेत 22 रोजी जलसप्ताह अंतर्गत शासन निर्णयानुसार जल साक्षरता प्रचार व प्रसार करण्यासाठी शाळेमध्ये जागतिक जलदिन साजरा करण्यात आला. यावेळी जलकुंभातील पाण्याचे पूजन शाळेच्या विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आले. आदिवासी वस्ती वर पाणी वापराचे महत्व यावर शाळेचे मुख्यध्यापक तथा पर्यावरण मित्र शाळीग्राम निकम पाणी हेच जीवन, करा त्याचे जतन यावर माहिती विशद केली.
व्हाय वेस्ट वॉटर पाणी वाया का घालवता या जागतिक थीमचा उद्देश सांगितला. पाणी शिळ झाले म्हणून पाण्याची टाकी करू नका उलटी पालटी उद्या तलावातलच पाणी अटल तर काय करेल मुन्सिपाल्टी या विषयांवर मार्गदर्शन केले. शिक्षक ईश्वर पाटील यांनी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांकडून जल प्रतिज्ञा म्हणवून घेतली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शामराव माळी, महादू सोनवणे, पंढरीनाथ सोनावणे, साहेबराव भिल्ल आदी ग्रामस्थ उपस्थित होते.