उमर्देसह दहिंदुले गावाला भेट ; पाणी फाऊंडेशनच्या कामांची केली पाहणी
नंदुरबार- पाणी वाचविण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केल्यास भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा सिन अभिनेते व पाणी फाउंडेशनचे प्रणेते आमिर खान यांनी व्यक्त केली. तालुक्यातील उमर्देसह दहिंदुले गावाला त्यांनी भेट देऊन पाणी फाऊंडेशनच्या कामाची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत सिने अभिनेता रणवीर कपूर, किरण रॉय यांची उपस्थिती होती.
अभिनेत्यांना पाहण्यासाठी उसळली गर्दी
सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास नंदुरबार येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळील मैदानावर हॅलीपॅडव्दारे सिने अभिनेत्यांचे आगमन झाले. चारचाकी वाहनाव्दारे बायपास रोडने त्यांचा ताफा दहिंदुले येथे सोमवारी सकाळी 9 वाजून 20 मिनीटांनी पोहचला़ या ठिकाणी त्यांनी श्रमदान करून गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला़ भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी श्रमदान करण्याचे आवाहन त्यांनी केल़े सकाळी साडेअकरा वाजता नंदुरबार तालुक्यातील उमर्दे येथे श्रमदानासाठी आमीर खान व सहकारी रवाना झाल़े यावेळी जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी आदी उपस्थित होत़े
ग्रामस्थांसोबत उघड्यावरच जेवण
सोमवारी दुपारी ग्रामस्थांसोबत दुपारच्या जेवणाचा आनंद आमीर खान आदींनी घेतला़ त्यांच्यासाठी ग्रामस्थांकडून कढी, खिचडी व मक्याच्या भाकरीची व्यवस्था केली होती़ यावेळी सोबत पत्नी किरण राव व अभिनेता रणवीर कपूरसुध्दा होत़े