जळगाव । सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, जळगाव तर्फे आयोजित करण्यात येणार्या विविध उपक्रमांमध्ये यावर्षी मोट्या प्रमाणात भर पडली आहे या मध्ये शुक्रवार 17 रोजी संपन्न झालेल्या ‘बुलेट रॅली’ व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे व आई राजमाता जिजाऊ यांच्या संकल्पनेतील स्वराज्य घडवितांना निर्माण केलेली सर्व जाती-धर्मातील अभेद्य अशी एकतेची शक्ती जळगावकरांनी बुलेट रॅलीव्दारे पाहिली. या वेळी शहरातील नागरिकांचे या बुलेट रॅलीं ने लक्ष वेधून घेतले होते.
मान्यवरांच्या हस्ते रॅली ला सुरुवात
काल शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता काव्यरत्नावली चौकातून आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, श्रीराम पाटील, शिवश्री कैलास सोनवणे, विनोद देशमुख,मुकूंद सपकाळे, अॅड. विजय पाटील, प्राचार्य एल.पी. देशमुख, किरण बच्छाव, आबा कापसे, नगरसेवक दुर्गेश पाटील, नगरसेवक संदेश भोईटे, शंभू पाटील, सुरेश भापसे, सुरेंद्र पाटील, राम पवार आदी प्रमुख मान्यवरांनी छत्रपतींच्या स्वराज्याचा भगवा झेंडा दाखवून बुलेट रॅलीस प्रारंभ झाला.
134 बुलेटस्वार रॅलीत सहभागी
अतिशय शिस्तीत, एकाच गतीने निघालेली बुलेट रॅलीची धडधड जळगावकरांच्या अभिमानाचा विषय ठरला. साधारण 134 सर्व जाती-धर्मातील, सर्व स्तरातील, सर्व वयोगटातील दिमाखदार बुलेटस्वारांनी या बुलेट रॅलीचा रुबाब वाढविला. बुलेटस्वारांसह नुतन मराठा महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांसह अनेक शिवप्रेमींनी रक्तदान केले. या वेळी विनोद देशमुख, रमेश पाटील, नगरसेवक संदेश भोईटे, रविंद्र पवार, मल्हार जाधव, प्रमोद पाटील आदींनी रक्तदान करुन शिबीराची सुरुवात केली. याप्रसंगी बुलेट रॅलीत सहभागी असलेल्यामध्ये राहुल चौधरी, विकास नरवाडे, जितेंद्र चव्हाण, युगल जैन, अजिंक्य देसाई, रमेश पाटील, डॉ. अरुण पाटील, डॉ. गणेश पाटील, मनोज जवरे, भोला राठोड, शाम कपूर, धनराज वाडेकर, पराग सुर्यवंशी, किरण सोनवणे, राहुल पाटील, पियुष पाटील, प्रा. भगतसिंग निकम, जयदीप गावंडे, सतिलाल पाटील, रुपेश ठाकूर, मयुर कापसे, अमरजित साळुंखे आदींसह असंखय शिवप्रेमी होते. काव्यरत्नावली चौकातून सुरुवात झालेली ही बुलेट रॅलीचा नुतन मराठत्ता महाविद्यालयात बुलेट रॅलीचा समारोप झाला.