जळगावकरांनी सत्ता दिल्यास वर्षभरात चेहरा मोहरा बदलू

0

ना. गिरीश महाजन यांचे आश्‍वासन
जळगाव । जळगावकरांनी सत्तादिल्यास एका वर्षांच्या आत 100 ते 150 कोटींची विकास कामे करू. यात रस्ते, गटारी,लाईट आदींचा समावेश असले. विधानसभेच्या निवडणूकीपर्यंत शहराचा चेहरा मोहरा बदलेला असेल असा विश्‍वास ना. गिरीश महाजन यांनी पत्रकारांनी बोलतांना व्यक्त केला. काल मुख्यमंत्र्याकडे झालेल्या बैठकीत सेना भाजपाकडून युती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु, यात जागा वाटपाबाबत बोलणे झालेले नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून फॉर्म मागविण्यात आले आहे. भाजपा किती जागांवर सक्षम आहे याचा अंदाज घेत आहे. परवापर्यंत चित्र स्पष्ट होईल असे ना. महाजन यांनी सांगितले.

युती ही निश्‍चित आहे मात्र, जागा वाटप हा देखील महत्वाचा मुद्दा असल्याचे ना. महाजन यांनी सांगितले. महापौरपद भाजपला देण्याची मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी योवळी स्पष्ट केले. सक्षम उमेदवार पाहून प्रस्ताव ठेवणार आहे. इतर पक्षांतील इच्छुकांनी त्यांच्याशी संपर्क साधला असून यात काही आजी नगरसेवकांचाही समावेश असल्याचा गौप्यस्पोट ना. महाजन यांनी केला. शहराची विकासाबाबतची परिस्थिती गेल्या पंधरावर्षांत अत्यंत वाईट झाली आहे. मला वाटते कोणत्याही महापालिकेत नसेल अशी परिस्थिती जळगाव महापालिकेची झालेली आहे. निधी नाही, पैसा नाही, कर्जांचा मोठा बोजा या महापालिकेवर आहे. यातून सुटका करावायची आहे. शहराच्या विकासासाठी मोठा निधी आणावयाचा आहे. याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. जळगावाला या सर्व चक्रव्युहातून बाहेर काढायचे असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही. लोकांनी आम्हाला निवडून द्याव. विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी जळगाव शहाराचा कायापालट आम्ही करून दाखवू.

राष्ट्रवादीचे आ. सतिश पाटील यांनी आ. एकनाथराव खडसे व आ. राजुमामा भोळे यांना भाजपात डावलेले जात असल्याचे म्हटले आहे. याला उत्तरदेतांना ना. महाजन यांनी सतिशआण्णा तुम्ही तुमच्या पक्षाचे दोन चार नगरसेवक निवडून आणण्याची चिंता तुम्ही करा. युतीच्या बाबतीत आमची युती पुर्वीपासून आहे. पुर्वापार आहे. आपण आपल्या पक्षाची जिल्ह्यामध्ये काय अवस्था आहे याची काळजी घ्या. भाजपा सेनेची काळजी घेवू नका असा टोला लगावला. सतिशआण्णांना अधिकार काय ? तुम्ही व काँग्रेसचे बघा. उगीच दुसरीकडे लक्ष देवून पुन्हा झीरो होणार नाही याची चिंता करा. जामनेरमध्ये सर्व नेते येवून एकसुध्दा जागा जिंकता आली नाही तशीच परिस्थिती जळगावमध्ये होईल असा इशारा ना. महाजन यांनी दिला. आ. राजुमामांना डावलेले नाही. निवडणूकीच्या सर्व अधिकार आ. भोळे यांना दिले असे ना. महाजन यांनी स्पष्ट केले. जळगावकरांच्या भाजपाकडून अपेक्षा आहेत. संधी दिल्यास वर्षभरांत सर्व बॅकलॉग भरून काढून असे आश्‍वासन ना. महाजन यांनी दिले.