जळगावकरांशी असलेला स्नेह आजही कायम

0

जळगाव । लहानपणी जळगावात मावशीच्या घरी प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत येत होतो. त्यावेळी सुभाष चौक, रथ चौक परिसरातील आठवणी आजही कायम आहेत. राजकमल टॉकीज,भैय्याजीची कुल्फी आजही कायम आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षात फार काही बदल झाला नसला तरी उन्हाळ्यात मात्र मोठा बदल झाला आहे, जळगावात आल्यानंतर प्रत्येक नातेवाईकाची भेट घेतली.

नाट्य प्रयोग सादर करण्याचा आपला प्रयत्न
रथ चौकात गेल्यानंतर परिसरातील मित्रांशी गप्पा केल्या. जळगावकरांशी आपला बालपणापासूनचा स्नेह आहे, तो कायम राहील. कला ही आज व्यावसायिक झाली असली तरी जळगावात नाटकाचा प्रयोग आपण करू , जळगावसह खान्देशात नाट्य प्रयोग सादर करण्याचा आपला प्रयत्न राहील करणार असल्याचे प्रतिपादन प्रसिध्द मराठी सिने अभिनेता अभिनेता जितेंद्र जोशी यांनी केले. किडझी प्री स्कूलतर्फे 16 एप्रिल रोजी गंधे सभागृहात लहान मुलांसाठी चित्रकला, फॅन्सी ड्रेस, नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रसिध्द अभिनेता जितेंद्र जोशी यांच्या हस्ते झाले.

संबंध जोपासणे मोठे काम
व्यस्त वेळात संबंध जोपासणो सर्वात मोठे काम असते. कारण स्टारपण आज आहे उद्या नाही. मात्र नाती ही कधीच तुटत नसल्याचे सांगितले. या वेळी आमदार सुरेश भोळे, महावीर ज्वेलर्सचे अजय ललवाणी, किडझी स्कूलचे पुनीत ललवाणी, रोहन ललवाणी, चेतना ललवाणी यांची उपस्थिती होती. यात शहरातील 130 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. प्रसंगी जितेंद्र जोशी यांनी पालकांशी संवाद साधला.