जळगाव । दिवसभर रिपरिप ठाण मांडलेल्या पावसाने चाकरमानींची त्रेधातिरपिट उडाली. दुपारी बाजारहाट करण्यास आलेल्या गृहीणींची तारांबळ झाली. बच्चे कंपनीने पावसाचा आनंद लुटला तर तरुणाई चिंब भिजली. शहर परिसरात आलेल्या आषाढसरींनी जळगावकरांना सुखद धक्का दिला. जयप्रकाश नारायण चौकातील बँक स्ट्रीट परिसरास तलावाचे स्वरुप आले.