जळगावकर बेहाल पाणी देता का हो पाणी !

0

जळगाव । गेल्या काही दिवसा पासून शहरवासी पाण्यामुळे वंचित राहिले. याकाळात महापालिका नागरिक सुविधान बाबत किती जागृत असल्याचा प्रयत्य मागील काही दिवसात आला. महापालिकेद्वारे वेळापत्रकानुसार जाहीर नियोजित पाणीपुरवठा न झाल्याने जळगाकरांमध्ये संताप निर्माण झाला आहे. याची दखल घेत महापौर व आयुक्त यांनी महावितरणच्या अधिकार्यांची भेट घेऊन समस्या सोडविण्याबाबत चर्चा केली होती. वादळ वार्यामुळे चिंचोली-उमाळा दरम्यान बाटलीवाला कारखानाजवळ दोन झाडे उन्मळून पडल्याने विद्युत तारा बंद पडल्या, औद्योगिक वसाहतीतील व्ही सेक्टरमध्ये झाड कोसळल्याने तारा तुटल्याने त्यामुळे क्युबिक बॉक्समध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. यासर्व झालेल्या घटनामुळे पाच दिवसांपासून वाघुर धरणावरील पंपीग स्टेशनचा वीजपुरवठा खंडीत झाल्याने शहराची जीवनवाहिनी म्हटले जाणारा पाणीपुरवठा बंद झाला होता. यामुळे नागरिकांनी महापालिका आयुक्त सोनवणे यांचे कार्यालय गाठत आपल्या समस्या मांडल्या होत्या.

24 विहरींची आली जाग : 1998 ते 2000 या वर्षामध्ये जळगावशहरावर पाण्याचे मोठे संकट होते. गिरणा नदीतून पाणी पुरवठा करण्यात येत होता. शहरात असलेल्या विहिरी त्याकाळी जिवंत करण्याचा प्रस्ताव तत्कालीन नगरपालिकेमध्ये मांडण्यात आला. हा ठराव मंजूर झाल्यानंतर विरोधी तितकाच झाला होता. गिरणा नदी पूर्णपणे आटली होती. त्याकाळी पाण्याची समस्या निर्माण झाल्यावर नागरिकांचे हाल होवू नयेत म्हणून शहरातील कांचन नगर, बालाजी पेठ, शनिपेठ, दाळ फळ,गवळी वाडा,काटा फाईल,भिलपुरा, चौघले प्लाट, शिवाजी नगर,मण्यार वाडा,जुने जळगाव यासह परिसरामधील मृत झालेल्या विहिरी जिवंत करण्यात आल्या, शहराच्या संपूर्ण परिसरात त्याकाळी तहानलेल्या जळगावकरांना पाणी पुरवठा करण्यात आला होता. यातून बोध घेत महापालिका प्रशासनाला त्या 24 विरीची पुन्हा जाग आली असून विहिरीची स्वच्छता करून याठिकाणी मोटार पंप बसविण्यात येणार आहे. त्यावर 1 हजार लिटरची टाकी बसवून चार नळ लावण्यात येतील. तसेच सात दिवसात यासाठी निविदा काढणार असल्याचे आयुक्त सोनवणे यांनी सांगितले आहे.

मनपाच्या अनास्थेचे पुन्हा एकदा दर्शन : महावितरणाकडून वीजपुरवठा सुरु करण्यात आल्यावर देखील विविध परिसरातील नागरिक अद्याप पर्यत पाण्या पासून वंचित असून दिलेल्या नियोजित वेळेत देखील नागरिकांना पाणीच मिळाले नसल्याने मनपाच्या अनास्थेचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहे. काहीभागात पाणीपुरवठा दुर्गंधी युक्त पिवळे पाण्याचा पुरवठ्याने नागरिकामध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट आहे. यामुळे आरोग्य देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे.

येथे झाला पाणीपुरवठा
पाणी पुरवठा होणार म्हणून नागरिकांची सार्वजनिक नळावर झुंबड उडत आहे. पाण्यासाठी वादाला देखील सामोरे जाण्याच्या घटना घडत असून रामानंद नगर, नेहरू नगर, शास्री नगर, अंबिका सोसायटी, इंद्रप्रस्थ नगर, सानेगुरुजी कॉलनी, यशवंत नगर,मुंदडा नगर,पार्वती नगर,श्रद्धा कॉलनी,कोल्हे नगर, विद्युत कॉलनी, गणेश कॉलनी,प्रिप्राळा,हुडको,खंडेराव नगर,खोटे नगर महाबळ कॉलनी,मेहरूण परिसर आदी ठिकाणी महापालिकेकडून पाणी पुरवठा करण्यात आला आहे. मात्र दुर्गधी युक्त व पिवळेसर पाणी असल्याने नागरिकान मध्ये प्रचंडरोष निर्माण झाला आहे. गेल्या अनेक दिवसापासून मनपा मध्ये तक्रारी करून देखील समस्याचे निराकरण होत नसल्याने प्रचंड संताप आहे.

आज या ठिकाणी होईल पाणीपुरवठा
एकाच वेळी शहराच्या परिसरात पाणी सोडल्याने कमी दाबाने पाणी येत होते. त्यामुळे बर्‍याच नागरिकांना पुरवठा करून देखील पाणी मिळाले नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या असून जुने जळगाव,शाहूनगर ,सुप्रीम कॉलनी ,आयोध्या नगर या संपूर्ण परिसरात आज पाणी पुरवठा होणार आहे.

कमी दाबाने होतोय पुरवठा
आज ट्रॅक्टर व मनपाच्या अग्निशामक दलाच्या वतीने शहराच्या विविध भागात पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यावेळी पाण्यासाठी मोठी गर्दी नागरिकांची होत असून पाण्याचे महत्व पटवून देणारे उत्तम दर्शन घडल्याची चर्चा नागरिका मध्ये आहे. एकाच वेळी शहराची जलवाहिनी बंद पडल्याने पुरवठा सुरु झाल्यानंतर शहरात पाणी सोडताना मनपा कर्मचार्‍याची दमछाक उडाली होती. तर मेहरुण परिसरात नागरिकांनी पाण्यासाठी मोठी रांग लावली होती. गेल्या सहा दिवसांत जळगावकरांची जलवाहिनी बंद पडल्याने काय परिणाम झाला. याचा प्रत्येय या दिवसात झाला.