जळगावचे 400 कोटींचे ‘अमृत’ अन्यत्र जाणार?

0

जळगाव । शहराची 400 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना वांध्यात सापडली आहे. सव्वा वर्ष उलटून देखिल महापालिकेने योजनेच्या कामांचे कार्यादेश न दिल्याने मान्यता रद्द करुन निधी अन्य शहरांच्या प्रकल्पांसाठी वापरण्याचा इशारा शासनाने दिला आहे. पाणीपुरवठा योजनेच्या पहील्या टप्प्यातील कामासाठी 191 कोटींची निविदा देखिल काढण्यात आली होती. मात्र, मक्तेदार एजन्सीने निविदा दरांच्या वादात दुसर्‍या एजन्सीविरोधात दावा केल्याने कार्यादेश देण्याची प्रकीया प्रलंबित आहे.

कार्यादेशाच्या उदासिनतेवर प्रश्‍नचिन्ह
याबाबत नगरविकास विभागाचे सह सचिव पां.जो. जाधव यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देवून 23 जून 2016 रोजी प्रकल्पास मान्यता दिली. तसेच निविदा प्रक्रीया पूर्ण केल्यानतंर देखिल कमी दराच्या मक्तेदारास कायादेश न दिला नसल्याचे म्हटले आहे. तातडीने कार्यादेश देणे आवश्यक होते. मात्र महापालिकेने अद्यापही कार्यादेश दिले नाहीत. कार्यादेश देण्याचे बाबींची पूर्तता केली नाही. तसेच यासाठीच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत असेही पत्रात म्हटले आहे.

30 सप्टेंबरचा अल्टीमेटम
या पत्रात कार्यादेश देण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. अन्यथा प्रकल्पास दिलेली प्रशासकीय मान्यता रद्द करुन उपलब्ध केलेला निधी अन्य अमृत शहरांच्या प्रकल्पांसाठी वापरला जाईल असा इशारा देखिल देण्यात आला आहे.