मुक्ताईनगर- चारचाकीचा पाठलाग करून वाहन चालकास मारहाण करीत त्याच्या गळ्यातील 32 हजार रुपये किंमतीचे दहा ग्रॅमची चैन लांबवणार्या जळगावातील तिघा संशयीतांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दिलीप रामभाऊ पाटील (मायादेवी नगर, प्लॉट नं.9/3, जळगाव) हे सोमवारी रात्री पूरनाड फाट्याकडून जळगावकडे महामार्गावरून चारचाकी (क्रमांक एम.एच.19 सी.यु.2727) ने जात असताना आरोपींनी चारचाकी स्वीप्ट (एम.एच.39 जे.0027) ओव्हरटेक करून पाटील यांच्या वाहनापुढे लावली. काही कळण्याआत वाहनातील संशयीत सी.एस.इंगळे व अन्य दोन अनोळखी इसमांनी मारहाण व शिवीगाळ करीत पाटील यांच्या गळ्यातील दहा ग्रॅम वजनाची चैन लांबवली. हॉटेल फुलोर्याजवळील यादव ढाब्याजवळ ही घटना घडली. मुक्ताईनगर पोलिसात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल असून त्यांचा कसून शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.