जळगावच्या कादंबरीच्या चित्रांचे अमरावतीला प्रदर्शन !

0

जळगाव: आयएमआर महाविद्यालयात एमसीएच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेली विद्यार्थिनी कादंबरी चौधरी हिने रेखाटलेल्या चित्रांचे ‘चित्रबोध’हे प्रदर्शन अमरावती शहरातील प्रसिद्ध कलादालनात पी.एन.गाडगीळ ज्वेलर्स येथे ९ ते १३ जानेवारीला होणार आहे. कादंबरीने चित्रकलेचे शिक्षण घेतले नसून तिला ही कला उपजत मिळाली आहे. कादंबरीला लहानपणापासून चित्रकलेची आवड आहे. कादंबरीने चित्रांगणच्या माध्यमातून जळगावातील पी.एन.गाडगीळ येथील कलादालनात चित्रांचे प्रदर्शन भरविले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.