आमदार सुरेश भोळे यांची औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी
मुंबई:- जळगावात बिकट होत चाललेल्या गाळेधारकांच्या समस्यांविषयी जळगावचे आमदार सुरेश भोळे यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे निवेदन केले. जळगाव शहरातील 2200 गाळेधारक संपावर चालले असून हा गाळेधारकांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सोडवावा, अशी मागणी भोळे यांनी विधानसभेत केली.
इतक्या मोठ्या प्रमाणात गाळेधारक संपावर गेल्यास जळगावातील नागरिकांना सुविधा मिळणार नाहीत यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे सांगत भोळे यांनी यावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.