जळगावच्या तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनीजवळील हनुमान नगर भागातील 21 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ज्ञानेश्वर अर्जुन पाटील (21) असे मयत तरुणाचे नाव आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही.

घरात कुणी नसताना केली आत्महत्या
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी, मेहरुन परीसरातील हनुमान नगरात रहिवासी ज्ञानेश्वर अर्जुन पाटील (21) या तरुणाने मंगळवार, 1 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घरात कोणी नसताना छताला दोरी बांधून गळफास घेतला. आत्महत्या करण्यामागील कारण कळू शकले नाही. ज्ञानेश्वर हा जळगाव शहरातील फुले मार्केट येथे एका भांड्यांच्या दुकानात कामाला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, लहान भाऊ असा परीवार आहे. याबाबत जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली. तपास नाईक दत्तात्रय बडगुजर करीत आहे.