जळगावच्या दाम्पत्यासह मुलाला मारहाण

जळगाव : लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरुन दाम्पत्यांसह मुलांना मारहाण करीत शिविगाळ करण्यात आली. जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीत घडलेल्या घटनेप्रकरणी तब्ब्ल दहा दिवसानंतर याप्रकरणी सोमवार, 26 डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीत ममता बेकरीजवळ ममता बेकरीजवळ शेख रफिक शेख अब्दुल (45) हे वास्तव्यास आहेत. याच ठिकाणी रईस पटेल हे सुध्दा याचठिकाणी राहतात. 17 डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शेख रफिक यांचा मुलगा अब्बू गफाट व रईस पटेल यांचे भांडण सुरु होते. शेख रफिक हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता, त्यांना व त्यांचा मुलगा अब्बू यास रईस पटेल व याच्यासह दोन जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली, यात एकाने शेख रफिक यास दगड मारुन जखमी केले. याचदरम्यान शेख रफिक यांची पत्नी साकीरा बी ही आली असता, तिला सुध्दा रईस पटेल व इतर दोन जणांनी चापटा बुक्क्यांनी मारहाण केली, या मारहाणीत शेख रफिक हे जखमी झाले आहे, उपचारानंतर तसेच वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारावर तब्बल दहा दिवसांनी सोमवार, 26 डिसेंबर रोजी याप्रकरणी शेख रफिक यांच्या जबाबानुसार एमआयडीसी पोलिसात रईस पटेल व त्याचे दोन साथीदार अशा तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील करीत आहेत.