जळगावच्या पार्वतीनगरात डॉक्टरचा निर्घृण खून

0

जळगाव । जळगावातील पार्वतीनगरात जिल्हा कुष्ठरोग विभागाचे तथा आरोग्यसेवा विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.अरविंद सुपडू मोरे यांची गळा चिरून खुन केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी पोलिस अधीक्षक दत्तात्रर कराळेंसह बड्या अधिकार्रांनी भेट देवून पाहणी केल्यानंतर मोरे रांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला तर पाराजवळ करवत आढळली आहे. तर पारांचे ठसे देखील फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला आढळुन आले आहे.

नातेवाईकांचा आक्रोश
डॉ. मोरे यांच्या मानेवर खोल वर जखम झाली असून. झालेला वार अत्यंत खोलवर झालेला आहे. कंठ ते मणक्याच्या हाडापार्यंत धारदार शस्त्राद्वारे खोलवर वार झालेला असल्याचे माहिती वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून मिळाली आहे. रात्रीच डॉ. मोरे याच्या मृत्यूची बातमी नाशिक येथील नातेवाईकांना यांना देण्यात आली होती. सायंकाळी साडेचारच्या सुमारास डॉ. मोरे यांचे भाऊ प्रकाश मोरे, शिक्षण उपसंचालक दिलीप गोविंद, शालक व भाचा हे जिल्हा सामान्य रुग्णालयात आले. मृतदेह पाहिल्यानंतर त्यांनी आक्रोश केला.

कॉल तपासणीची मागणी
डॉ. मोरे रविवारी सकाळी 8.30 च्या सुमारास बाहेरुन नाश्ता पिशवीत आणतांना दिसले. यानंतर दुपारी साडेबारा वाजता डॉक्टरांना समोरील व्यक्तीने घराची खिडकी लावतांना बघितले. शनिवारी रात्रीपर्यंत ते रुग्णालयातील विभागाच्या कर्मचार्‍यांशी संपर्कात होते. आज सकाळी आरोग्य पाहणी समिती आल्यानंतर त्यांना घेण्यासाठी चालक घरी गेल्यावर देखील फोन उचलला जात नव्हता. नातेवाईकांकडून कॉल डिटेक्ट तपासण्याची मागणी पोलिस अधीक्षकांकडे केली. डॉ. मोरे शनिवारी दुपारी नाशिकला जाणार होते. सोमवारी समिती येणार असल्याने शनिवारी थांबले. दुपारी तीन वाजता गितांजली एक्सप्रेसने जाण्यासाठी निघाले रेल्वेस्थानकावरून परत रुग्णालयात आले. समितीच्या दौर्‍याचा आढाव्याचे नियोजन करून सायंकाळच्या गाडीने जातो असे कर्मचार्‍याने सांगितले. सात पर्यंत रुग्णालय थांबल्यानंतर कर्मचार्‍यांना मी आता काही नाशिकला जात नाही असे सांगितले. नंतर वाहन चालक जाधव यांनी रात्री आठ वाजता डॉ. मोरे यांना त्यांच्या घरी सोडले.