जळगाव : शहरातील पिंप्राळा शिवारातील इंद्रनिल सोसायटीमध्ये घरफोडी झाल्याची घटना सोमवार, 23 रोजी उघडकीस आली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रामानंद नगर पोलिसात गुन्हा
शहरातील पिंप्राळा शिवारातील इंद्रनिल सोसायटी परीसरात संध्या नितीन येवले वास्तव्यास आहेत. 9 ते 23 रोजी दरम्यान, त्यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारीत घरातील साहित्य सुमारे 20 हजारांचे साहित्य लंपास केले. चोरट्यांनी त्यांच्या घरातून 19 हजार 500 रुपयांचा टीव्ही, 240 रुपयांची चांदीची अंगठी, 500 रुपयांची तुळशीची माळ असा एकूण 20 हजार 240 रुपयांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी शनिवारी सायंकाळी संध्या येवले यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार संजय सपकाळे करीत आहे.