A young man from Dombivli was crushed by a speeding vehicle in Jalgaon जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील बांभोरी पुलाजवळ पायी चालणार्या तरुणाला अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. गुणवंत पाटील (26, रा.डोंबिवली, जि.ठाणे), असे मयताचे नाव आहे. हा तरुण नेमका जळगावात कशामुळे आला याची माहिती कळू शकली नाही.
अज्ञात वाहनधारक अपघातानंतर पसार
गुरुवारी सकाळी 10 वाजता गुणवंत पाटील हा तरुण रस्त्याने पायी जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाने त्यास चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. होता. तरुणाजवळ दवाखान्याच्या उपचाराचे कागदपत्रे असलेली पिशवी आढळली आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे किरण अगोणे व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांकडून त्या वाहनाचा शोध
गुणवंत याच्या पोटावरुन चाक गेले होते. त्याला तातडीने शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले. कागदपत्रांवरुन तो डोंबिवलीचा रहिवाशी असून कल्याण येथे उपचार घेतले आहेत. तो जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी किंवा त्याचे कुणी नातेवाईक इथं असावेत असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पोलिसांकडून तरुणाला धडक देणार्या वाहनाचा शोध सुरू करण्यात आला आहे.