जळगावच्या महिलेवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार : एकाविरोधात गुन्हा

A woman in Jalgaon was raped for three years on the promise of marriage जळगाव : शहरातील एका भागात मुलासह राहणार्‍या 32 वर्षीय महिलेला लग्न करण्याचे वचन देत एकाने सलग तीन वर्ष विविध शहरांमध्ये नेत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडीत महिलेच्या तक्रारीनंतर रामानंद पोलिसात निलेश दत्तात्रय सोनजे या संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

लग्नाचे वचन देत केला अत्याचार
32 वर्षीय पीडीता मुलांसह एका भागात राहते. संशयीत निलेश दत्तात्रय सोनजे याच्याशी तिची ओळख झाल्यानंतर संशयीताने 2019 ते 2022 पर्यंत दरम्यान लग्न करेल, असे वचन देत महिलेला पुण्यासह जळगाव, धुळे या ठिकाणी नेत वारंवार अत्याचार दिला तसेच शारीरीक संबंधास पीडीतेने विरोध केल्यानंतर संशयीत निलेशने तिच्या मुलांना जीवे ठार मारेल, अशी धमकी दिली.

आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध
याप्रकरणी निलेश सोनजे याच्या विरोधात रामानंद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक रोहिदास गाभाले करीत आहेत.