जळगाव:- दुय्यम निबंधक कार्यालयातील शिपायासह खाजगी पंटरला दोन हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीने रंगेहाथ पकडले. सोमवारी दुपारी हा सापळा यशस्वी झाला. दुय्यम निबंधक कार्यालयातील शिपाई अरुण पाटील व पंटर राजेंद्र सोनवणे यांना सापळा रचून पकडण्यात आले. दस्तावेजांच्या प्रमाणित प्रती देण्यासाठी आरोपींनी लाच मागितली होती. ही कारवाई जळगावे एसीबीचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नीता कायटे व सहकार्यांनी केली.