जळगाव : श्रीधर नगर भागातील माहेर असलेल्या विवाहितेचा लग्नानंतर हुंड्याचे पैसे न आणल्याने मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरूद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
रामानंद नगर पोलिसात गुन्हा
श्रीधरनगर येथील माहेर असलेल्या राजेश्वरी अमित माळी यांचा जळगावातीलच विठ्ठलपेठ येथ अमित अरुण माळी यांच्यासोबत विवाह झाला. लग्नानंतर हुंड्याच्या पैशांसाठी पतीसह सासू व सासरच्या इतर मंडळींनी राजेश्वरीचा मारहाण करीत छळ केला. हा छळ असह्य झाल्याने राजेश्वरी माहेरी निघून आल्या व याबाबत बुधवार, 16 मार्च रोजी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिल्यावरून पती अमित अरुण माळी, सासू मंजू अरूण माळी, चुलत सासू जयश्री बालमुकुंद माळी, चुलत सासरे बालमुकुंद महारू माळी (सर्व रा. विठ्ठल पेठ, जळगाव) व नणंद प्रतिभा भवरलाल गुजर, व भवरलाल गुजर (दोन्ही रा.पनवेल, मुंबई) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हवालदार सुनील पाटील हे करीत आहेत.