जळगावच्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

0

जळगाव- शहरातील समतानगर परिसरातील धामणगावाडा भागातील अलका रविद्र कांबळे (वय 25) या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. रविंद्र शिवाजी कांबळे हे सेंट्रींगचे काम करतात. आई पंचशिला वडील शिवाजी शंकर कांबळे, पत्नी अलका, भाची सपना देवरे व दोन मुलांसोबत ते धामणावाडा परिसरात वास्तव्यास आहेत. आई पंचशिला ही गावाला गेलेली आहे. तर वडील शिवाजी शंकर कांबळे हे मिस्तरी काम करतात. तेही कामावर गेलेले होते. बुधवारी रविंद्र हे नेहमीप्रमाणे कामाहून सायंकाळी 4 वाजता घरी परतले. काही वेळात अलकाचा अकस्मात मृत्यू झाल्याचे दिसून आले. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अलकाचे सासरे शिवाजी व पती रविंद्र या दोघांनी आक्रोश केला. रविंद्र यांना यश (वय 5 वर्ष) व श्रेया (वय 2 वर्ष) अशी मुले आहेत.