जळगावच्या विशाल फिरके यांस गोल्ड मेडल

0

जळगाव । नुकत्याच रइमदंग पु भूतान येथे संपन्न झालेल्या द. अशियाई आट्या-पाट्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघात जळगावच्या देवकर इंजि. महाविद्यालयाचा खेळाडू विशाल फिरके याने अंतिम सामन्यात भूतान संघावर मात करुन अजिक्यपद मिळविले. त्यास गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले. यापूर्वीही त्याने ज्युनिअर व सिनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सिद्धी विनायक विद्यालयाकडून सहभागी घेऊन प्राविण्य प्राप्त केले होते. अंतिम सामना भारत विजयी वि. भूतान 2.0 सेटने जिकला.

सर्व स्थरावरून शुभेच्छा
सेमी फायनलमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश झाला. त्यात विशालने सुर म्हणून संघासाठी उत्कृष्ट कामगीरी करुन देशात अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. त्याचा या यशाबद्दल जिल्हा संघटनेचे कार्यध्यक्ष उदय वाघ यांनी त्याचा गौरव केला या प्रसंगी अध्यक्ष आमदार. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार स्मिता वाघ, सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर, प्रशिक्षक अनिल माकडे कबड्डी संघटनेचे अध्यक्ष श्याम कोगटा, नितिन तायडे, अरुण श्रीखंडे, प्रताप कोळी, उपस्थित होते.