Jalgaon businessman extorted 31 lakhs by baiting him to double the money जळगाव : जळगावच्या व्यावसायीकाला रक्कम 13 महिन्यात दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने औरंगाबाद शहरातील सहा संशयीतांनी तब्बल 31 लाख 50 हजारांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध जळगाव जिल्हा पेठ पोलिस स्थानकात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगावच्या व्यावसायीकाला गंडा
जळगावातील व्यावसायीक महेश तुकाराम भोळे (सदोबा नगर, जळगाव) यांच्या फिर्यादीनुसार, संशयीत अरुण नागोराव अंभोरे यांनी शेंद्रा एमआयडीसी औरंगाबाद येथे इंडोपर्ल या नावाने शिंपल्यापासून मोती तयार करण्याची कंपनी स्थापन केली. या कंपनीत त्यांनी पत्नी मंदा अरुण अंभोरे, मुलगी दीपाली अंभोरे, राहुल शेळके, विनोद बाहेकर, आकाश आठल्ये अशा सर्वांना या कंपनीत संचालक केले. अवघ्या तेरा महिन्यात दुप्पट रक्कम दुप्पटीच्या आमिषाने त्यांनी आसोदा येथील महेश तुकाराम भोळे यांचा विश्वास संपादन केला. भोळे यांचे जळगाव शहरातील विसनजी नगर भागात फ्लॉवर पॉईंट नावाचे दुकान आहे. 13 महिन्यात 63 लाख रुपये मिळतील, या मोहाला बळी पडून महेश भोळे यांनी संशयीत आरोपींना 31 लाख 50 हजार रुपये दिले. त्यावर संशयित आरोपींनी स्वाक्षरी केलेले कोरे चेक महेश भोळे यांना देत कोणताही करारनामा केला नाही. मुदत संपल्यावरही पैसे परत मिळत नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे महेश भोळे यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी अखेर जिल्हापेठ पोलिस स्टेशनला याप्रकरणी तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील सहा.पोलिस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.