जळगाव: शहरातील महावीर क्लासेसतर्फे प्रथमच सायन्स ‘सायन्स कार्निवलचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्निवलमध्ये २०० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. केसीई इंजिनिअरींगच्या हॉलमध्ये सकाळी १० ते २ या वेळेत आयोजित करण्यात आले होते. सहभागी विद्यार्थ्यांचे ५० गट तयार करण्यात आले होते.
सकाळी १० वाजता सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते कार्निवलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नोबेल फाउंडेशनचे जयदीप पाटील, महावीर क्लासेसचे संचालक एन.जे.गादिया, विशाल पाटील, शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी परीक्षक म्हणून एस.एस.बी.टी. बांभोरी कॉलेजचे प्रा. कृष्णा श्रीवास्तव, महेश रावलानी, मिलिंद धनके रोबोटिक्स, ऑटोमेष्ण कन्सल्टंट अक्षय सरोदे यांनी काम पाहिले.
यशस्वी विद्यार्थ्यांना एकूण १२ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्यास पदक, तसेच सहभागी विद्यार्थ्यास प्रमाणपत्र देण्यात आले. कार्निवलच्या समन्वयक जया चोपडा होत्या. यशस्वीतेसाठी प्रमोद पिंगळे, जितेंद्र पाटील, प्रिया राणे, रोहिणी दिवाण, स्मिता कोठारी, ज्योती साळी, रेखा वाघ, वैशाली अहिरराव, अभिषेक राजपूत यांनी परिश्रम घेतले. गिरीश भोळे, वेदान्त बंग, रेया सय्यद, नीरज करोसिया, यांनी प्रथम पारितोषिक देण्यात आले, तर द्वितीयकांक्षिणी नेवे, अदनयी टेमकर, विधी पाटील, पद्मश्री सोनार, तृतीय जान्हवी शिंदे, प्रांजली वाणी, यांना देण्यात आले. तसेच विधी बागरेचा, स्नेहल ज्ञाने, मित काबरा, पृथ्वीराज पवार, मोईन शेख, ऋषिकेश पाटील, गनेस पाटील, मीनल चौधरी, प्रियंका पाटील, हेमांगी बोरसे, सिद्धेश येवले, अमेय भंगाळे, अनिमेष सरोदे, देवशिष भावसार, अद्वित महाजन, युक्ता पाटील, दीक्षा चौधरी, वैभवी ठाकरे, परिणीता चौगावकर, सार्थक जोशी, किरण सावदेकर, दानिष पाटील, प्रणीत शिंपी, सायन मंडल, यशोवर्धन पाटील, लोकेश चौधरी, रसिका बोरोले, सिद्धी पाटील, विवेक पाटील, अंकित पाटील, यश भोसले, भवन जोशी यांनी पारितोषिक पटकावले.