जळगावच्या हुडको परीसरातील 30 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

जळगाव : शहरातील पिंप्राळा हुडको परीसरातील 30 वर्षीय विवाहितेने शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला. या घटनेमागचे कारण स्पष्ट झाले नाही. सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे. काजल गजानन सुरवाडे (30) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

राहत्या घरी केली आत्महत्या
शनिवारी सकाळी काजलचे पती शौचास गेले होते. तर सासू जिजाबाई अंगणात होत्या. यावेळी काजलने घराला आतून दरवाजा बंद करुन पंख्याला साडी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. पती घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दरवाजा तोडून काजलला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करुन मृत घोषित केले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.